मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०१४

एके दिवशी थट्टा-मस्करीत




एके दिवशी
थट्टा-मस्करीत
त्याने पृथ्वीवर आखली
एक गोलाकार रेघ
आणि सांगितलं – “हे तुझं घर आहे.”
मी म्हणालो –
“ठीक, आता मी इथेच राहीन.”

पाऊस
थंडी
आणि घामापासून स्वतःला वाचवत
काही दिवस मी राहिलो
त्याच घरात

या गोष्टीला बरेच दिवस झाले
पण तेव्हापासून ते घर
माझ्या सोबतच आहे
मी येऊ घातलेल्या थंडीविरुद्ध
त्याला एका फिकट रंगीत स्वेटरप्रमाणे
परिधान केलं आहे.


मूळ कविता : एक दिन हँसी-हँसी में
मूळ कवी : केदारनाथ सिंह
मूळ भाषा : हिंदी




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा