मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०१४

वहाणा

सभा संपली
राहिल्या वहाणा
सुन्या अवस्थेत चकित उदास
धुळीने माखलेल्या वहाणा
आ वासलेल्या वहाणा ज्यांचा कुणीच
मालक नव्हता

चौकीदार आला
त्याने पाहिल्या वहाणा
मग तो खूप वेळ उभा राहिला
धुळीने माखलेल्या वहाणांसमोर
विचार करत राहिला –
किती विचित्र आहे
कि वक्ते निघून गेले
आणि सगळ्या चर्चांच्या शेवटी
राहून गेल्या वहाणा

त्या सुन्या सभागृहात
जिथे सांगण्यासाठी आता काहीच नव्हतं
किती काही, कित्ती काही
सांगून गेल्या वहाणा...

मूळ कविता : जूते
मूळ कवी : केदारनाथ सिंह

मूळ भाषा : हिंदी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा