जशा मुंग्या परततात
वारुळात
सुतारपक्षी परततो
खोडापाशी
विमाने परत येतात एकामागून
एक
लाल आकाशात पंख पसरून
विमानतळाच्या दिशेने
हे माझ्या भाषे
मी परततो तुझ्यात
जेव्हा निःशब्द राहून राहून
आखडून जाते माझी जिव्हा
आणि वेदनेने विव्हळ होते
माझी आत्मा...
मूळ कविता : मातृभाषा
मूळ कवी :
केदारनाथ सिंह
मूळ भाषा : हिंदी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा