मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०१४

स्पर्शहीन शिखर

राहून जातं अलिखित बरंच काही
लिहिल्यानंतरही

सांगून झाल्यानंतरही राहून जातं
बरंच काही सांगायचं

राहतात रस्ते अपरिचित
त्यांवर चालल्यानंतरही

स्पर्शहीन शिखरांच्या स्पर्शानंतरही

बरंच काही जाणून घेतल्यानंतरही
राहून जातं जाणून घेणं

जसे अश्रूंच्या मागे राहून जातात डोळे

खूप काही मिळवूनही
शोधत राहते एक खांदा

पण मिळत नाही...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा