शनिवार, ८ नोव्हेंबर, २०१४

नदी मागत आहे

नदी
मागत आहे माझ्याकडे
माझे अश्रू
तिला व्हायचंय समुद्र
समुद्राला न मिळता.

नदी एक स्त्री आहे
प्रत्येक स्त्रीसारखी घायाळ
आपल्या जखमांवर आपणच फुंकर घालणारी
माहित आहे तिला
ती मिळवू शकते पुरेसा खारटपणा
काही आणखी स्त्रियांच्या मदतीने
जो वाहतोय त्यांच्या स्वेद आणि अश्रूंतून....

नदी
मागत आहे
माझ्यासारख्या असंख्य स्त्रियांकडे
त्यांचे अश्रू
कारण समुद्राला न मिळताही
तिला समुद्र व्हायचंय...


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा