प्रेम म्हणजे
प्रेम असतं
प्रेम म्हणजे
प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणी आमचं
अगदी 'सेम' असतं !
काय म्हणता ?
या ओळी चिल्लर
वटतात
काव्याच्या
दृष्टीने थिल्लर वाटतात ?
असल्या तर असू दे,
फसल्या तर फसू दे
!
तरीसुद्धा
तरीसुद्धा,
प्रेम म्हणजे
प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणी आमचं
अगदी 'सेम' असतं !
मराठीतून इश्श
म्हणून
प्रेम करत येतं;
उर्दुमधे इश्क
म्हणून
प्रेम करता येत;
व्याकरणात चूकलात
तरी
प्रेम करता येतं;
कोन्वेंटमधे
शिकलात ती
प्रेम करता येतं
!
सोळा वर्ष सरली
की
अंगात फुलं फुलू
लगतात
जागेपणी
स्वप्नांचे
झोपाळे झुलू
लगतात !
आठवतं ना ?
तुमची आमची सोळा
जेव्हा,
सरली होती,
होडी सगळी
पाण्याने भरली होती !
लाटांवर बेभान
होऊन
नाचलो होतो,
होडी सकट बूडता
बूडता
वाचलो होतो !
बुडलो असतो
तारीसुद्धा चाललं असतं :
प्रेमानेच अलगद
वर काढलं असतं !
तुम्हाला ते कळलं
होतं,
मलासुद्धा कळलं
होतं !
कारण
प्रेम म्हणजे
प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणी आमचं
अगदी 'सेम' असतं !
प्रेमबीम झूट
असतं
म्हणणारी मणसं
भेटतात,
प्रेम म्हणजे
स्तोम नुसतं
मानणारी माणसं
भेटतात !
असाच एक जण
चक्क मला
म्हणाला:
"आम्ही कधी
बायकोला
फिरायला नेलं
नाही !
पाच मुलं झाली
तरी
प्रेमबी
कधीसुद्धा केलं नाही !
आमचं काही नडलं
का ?
प्रेमाशिवाय अडलं
का ? "
त्याला वाटलं मला
पटलं !
तेव्हा मी इतकंच
म्हणलं :
प्रेम म्हणजे
प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणी आमचं
मात्र 'सेम' नसतं !
तिच्या सोबत
पावसात कधी
भिजला असाल
जोडीने !
एक चोकलेट अर्ध
अर्ध
खाल्लं असेल
गोडीने !
भर दुपारी उन्हात
कधी तिच्या सोबत
तासनतास फिरला
असाल
झंकारलेल्या
सर्वस्वाने
तिच्या कुशीत
शिरला असाल !
प्रेम कधी रुसणं
असतं
डोळ्यांनीच हसणं
असतं,
प्रेम कधी
भांडतंसुद्धा !!
दोन ओळींची
चिठ्ठीसुद्धा प्रेम असतं,
घट्ट घट्ट
मिठीसुद्धा प्रेम असतं,
प्रेम म्हणजे
प्रेम म्हणजे प्रेम असतं !!
मंगेश पाडगांवकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा