मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०१४

नव्या शहरातील वटवृक्ष



जणूकाही मला ओळखतो वर्षानुवर्ष
पहा, त्या दाढीवाल्या वटवृक्षाकडे पहा
मला पाहिल्यावर
कसा झेपावत आहे
माझ्या दिशेने

पण वाईट याचंच वाटतं
कि चहापाण्यासाठी
मी त्याला घरी नाही घेऊन जाऊ शकत...


मूळ कविता : नए शहर में बरगद
मूळ कवी : केदारनाथ सिंह

मूळ भाषा : हिंदी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा