घरातून बाहेर पडताना
कधी कधी वाटतं
येऊच नये परत
का यावं परत फिरून
अशा ठिकाणी जिथे
नाही वाट पाहणारं कुणी...
निघून जावं दूर दूर
घेऊन पाखरांचे पंख
विस्तीर्ण आकाशात
नाही तर वाहून जावं
अथांग सागराच्या
प्रचंड लाटांत...
घ्यावं धरित्रीने मला
तिच्या उबदार पोटात
किंवा मग किमान
वाऱ्याने तरी न्यावं
मला दीर्घ प्रवासास
आणि आणूच नये परत...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा