माझ्या दारावर
लागलं आहे कुलूप
खूप मोठं आणि
खूप जुनं
दाराबाहेर उभे आहेत
चंद्र सूर्य आणि काजवे
मला पहायचंय चंद्राला
जाणून घ्यायचंय सूर्याला
आणि पकडायचे आहेत काजवे
मात्र अडसर आहे ते कुलूप
ज्याची चावी लपवली आहे
कोण्या अंधाऱ्या विहिरीत
आणि कुलूप लावणारा
पेटलाय हट्टाला...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा