शनिवार, २२ नोव्हेंबर, २०१४

दाणे


नाही,
आम्ही बाजारात जाणार नाही
वावरातून उचलले जाताना
सांगतात दाणे...

गेलो तर पुन्हा कधी परतणार नाही
जाता-जाताही
सांगतात दाणे...

आणि परतून आलो ही जरी
तरी तुम्ही आम्हाला ओळखू शकणार नाही
आपल्या शेवटच्या पत्रात
लिहून पाठवतात दाणे...

त्यानंतर अनेक महिने
वस्तीवर
कोणतंही पत्र येत नाही...


मूळ कविता : दाने
मूळ कवी : केदारनाथ सिंह

मूळ भाषा : हिंदी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा