जग म्हणे परिवर्तनशील आहे
इथे काहीच शाश्वत नाही
सारं काही बदलत राहतं
झिजत राहतं
आणि संपत जातं.
पण मग का संपत नाहीत
आठवणींच्या असंख्य मालिका,
आणि वेदनांचे दंश?
का नाही थाबत नियतीचं
तेच ते भेसूर सूर आळवणं,
सुकलेल्या जखमांचं
पुन्हा पुन्हा ओलावणं?
का नाही?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा