शनिवार, ८ नोव्हेंबर, २०१४

वस्तू

मुलीला वाटतं
कि पुसावेत
पित्याचे अश्रू,
आणि आईच्या दुःखांना
द्यावा आधार...
कोवळ्या उन्हातल्या
वाळवणाप्रमाणे
सुकून जाव्या साऱ्या जखमा,
म्हणून ती करते शृंगार
पुन्हा पुन्हा...
आणि दिवाणखान्यात
बसलेले मुखवटे
निरखतात तिला
आणि सरकतात पुढे
अधिक चांगल्या
वस्तूच्या शोधात...




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा