मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०१४

द्विधा

कुणीतरी माझ्या आत राहतं,

कधी सांगतं हे कर
कधी सांगतं ते कर
कधी ओढतं पाय तर
कधी सांगतं पुढे चल...

कधी हस
कधी रड...

कधी परंपरेला ठोकर मार
तर कधी तिचं पालन कर...

कधी सांगतं तळहातावर ठेव निखारा
कधी देतं पाणी की विझव त्याला...

कधी सांगतं घे आकाशात झेप
कधी सांगतं आघी जमिनीला तर पाय टेक...

मन दुविधेत असतं,
हो-नाहीच्या या संघर्षात मोठ्या मुश्किलीने साहतं,
माझ्या आत हे कोण राहतं?
जे माझ्याशी एवढं सारं बोलतं
कोण?





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा