गप्प राहून काही फायदा नाही
मी मित्रांना म्हणालो आणो
धावलो
सरळ शेतांच्या दिशेने
कि शब्द पिकले तर नाहीत ना?
ही दुपारची वेळ होती
आणि शब्द झाडांच्या मुळाशी
झोपले होते
सुगंध इथूनच येत होता – मी
म्हणालो
इथे – इथे – शब्द इथेच असू
शकतो
मुळाशी.
पिकणाऱ्या दाण्यांच्या आत
शब्दाच्या असण्याची पूर्ण
शक्यता होती
मला वाटलं मला एखाद्या
दाण्याच्या आत
घुसलं पाहिजे
दळण्यापूर्वीच मला पोहोचलं
पाहिजे
पिठाच्या सुरवातीला
मला असलं पाहिजे या क्षणी
जिथून
गाण्याचे आवाज येत आहेत.
हा आईचा आवाज आहे – मी
म्हणालो.
जात्यामध्ये आई होती.
दगडांच्या घर्षणातून आणि
पिठाच्या सुगंधातून
हळूहळू पाझरत होता
आईचा आवाज
मग मी झोपलो
कधी कुठे मला आठवत नाही.
फक्त जातं फिरत राहिलं
आणि आईचा आवाज येत राहिला
रात्रभर...
मूळ कविता : आवाज
मूळ कवी : केदारनाथ सिंह
मूळ भाषा : हिंदी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा