वाट पाहू नका
जे सांगायचं आहे
सांगून टाका
कारण होऊ शकतं
कि नंतर सांगण्याला काही
अर्थच राहणार नाही.
विचार करा
जिथे उभे आहात तिथूनच विचार
करा
भले राखेपासूनही सुरवात करा
पण विचार करा
त्या जागेचा शोध व्यर्थ आहे
जिथे पोहोचल्यावार हे जग
एका अफूच्या फुलात बदलून
जातं
नदी आहे निद्रामग्न
तिला झोपू द्या
तिच्या झोपण्याने
जगाच्या अस्तित्वाचा अंदाज
येतो आहे
विचारा
भले कितीही वेळा विचारावं
लागेल
भले विचारण्यात कितीही
त्रास होवो
पण विचारा
विचारा गाडी अजून किती
उशीरा आहे?
पाणी एक प्रकाश आहे
अंधारात हीच एक गोष्ट
जी तुम्ही पूर्ण विश्वासाने
सांगू शकता एकमेकांना....
मूळ कविता : पानी
एक रोशनी है
मूळ कवी :
केदारनाथ सिंह
मूळ भाषा : हिंदी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा