बुधवार, २६ नोव्हेंबर, २०१४

त्यांच्यासाठी नवे प्रश्न




अजून किती डिवचणार
आहात मला?
राग लोभाच्या कल्पनांतून
मी पार झालेय,
मनातल्या हृद्य स्मृतींतून
आता कुठे मी बाहेर आलेय...

कारस्थानांचे नवे डाव शोधा
पहा कुठे मिळतात...
कुठून आणावे नवे अश्रू
प्रश्न मोठा व्यामिश्र आहे
डोळ्यांमधली दृष्टी
आज अशी संमिश्र आहे...




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा