हे
हिंदुशक्ति-संभूत-दीप्ततम-तेजा
हे
हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे
हिंदु-सौभाग्य-भूतिच्या-साजा
हे हिंदु नृसिंहा
प्रभो शिवाजीराजा
करि हिंदुराष्ट्र
हे तूंते। वंदना
करि अंतःकरण तुज
अभि-नंदना
तव चरणिं
भक्तिच्या चर्ची चंदना
गूढाशा पुरवी
त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदुनृसिंहा
प्रभो शिवाजीराजा ।
हा भग्न तट असे
गडागडाचा आजी
हा भग्न आज
जयदु्र्गं आंसवांमाजी
ही भवानिची ह्या
पुन्हा गंजली धारा
ती म्हणुनि भवानी
दे न कुणा आधारा
गड कोट जंजिरे
सारे । भंगले
जाहलीं
राजधान्यांची । जंगलें
परदास्य-पराभविं
सारीं । मंगलें
या जगतिं जगू हीं
आज गमतसें लज्जा
हे हिंदु-नृसिंहा
प्रभो शिवाजीराजा
जी शुद्धि हृदाची
रामदासशिर डुलवी
जी बुध्दि पांच
शाहींस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति
कूटनीतींत खलांसी बुडवी
जी शक्ति
बलोन्मत्तास पदतलीं तुडवी
ती शुध्दि हेतुचि
कर्मी । राहु दे
ती बुध्दि भाबडया
जीवां । लाहु दे
ती शक्ती
शोणितामाजी । वाहु दे
दे पुन्हा मंत्र
तो दिलें समर्थे तुज ज्या
हे हिंदु नृसिंहा
प्रभो शिवाजीराजा ।
कवी- स्वा.सावरकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा