मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०१४

अंगठ्याचा ठसा



कुणी बनवली
वर्णमालेतील अक्षरं

ही काळी काळी अक्षरं
ही करडी करडी अक्षरं
कुणी बनवली?

खडूने
चिमणीच्या पंखांनी
वाळवीने
फळ्याने

कुणी
अखेर कुणी बनवली
वर्णमालेतील अक्षरं

‘मी... मी’ –
सगळ्या हस्ताक्षरांना
अंगठा दाखवत
हळूच म्हणाला
एक अंगठ्याचा ठसा

आणि एका टीपकागदात
अदृश्य झाला.

मूळ कविता : मातृभाषा
मूळ कवी : केदारनाथ सिंह
मूळ भाषा : हिंदी


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा