कागदावर लिहिलं
सम्राट,
सैन्य,
मग लिहिलं,
गुलाम,
गुलामगिरी,
जय-जयकार,
सम्राट खुश झाले...
आता लिहिलं मी
हुकुमशहा
निरंकुश
विद्रोह
आणि कारागृह
या वेळी
राजाच्या आदेशाने
तलवारीच्या पात्याने
माझ्या मस्तकावर लिहिलं गेलं
राजद्रोही !!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा