सोशल म्हणवून घेणारी मिडिया
जेव्हा विसरत असते
तिचं सोशल असणं
आणि चढवले जातात
रंग व्यक्तीपुजेचे
तेव्हा तेव्हा
नाकारावंच लागतं
असलं सोशल असणं,
हे कसलं सोशालिझम?
ही तर सरळ सरळ
व्यक्तीस्वातंत्र्याची पायमल्लीच,
अशावेळी द्यायलाच हवं
प्रत्युत्तर आणि विचारायलाच
हवेत परखड सवाल,
आणि नव्या उत्तरांना पारखून
घायला हवं
विवेकबुद्धीच्या कसोटीवर
किंबहुना आज
गरजेचंच आहे ते...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा