मुकी बासरी गाते
मनातल्या मनात
अंधाराचे गीत.
मुक्या बासरीत वास्तव्याला असतं
विझलेल्या आशांनी
आणि हरवलेल्या स्वप्नांनी
पछाडलेलं संगीत.
पाहत असते मुकी बासरीही स्वप्न,
घनदाट काळोख्या जंगलात
प्रकाशाच्या मुसळधार पावसाचं.
मुक्या बासरीत कैद आहे
अंधाराचं अनसुनं संगीत.
मूळ कविता: अंधारे का गीत
मूळ कवी: उज्ज्वला तिग्गा
मूळ भाषा: हिंदी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा