ते महान होते,
खूप महान,
ते खूप ज्ञानी होते,
महान होण्यासाठी गरजेच्या आहेत
किती सोपान
यांची गणती माहित होती त्यांना,
केवळ महान बनून
संतुष्ट नव्हते ते,
त्यांना उत्तमप्रकारे आत्मसात होती
महान बनून राहण्याची कला,
ते सिद्धहस्त होते
शोधून काढण्यात
अंदाजित उत्तर
या समीकरणाचे,
की किती खाली उतरल्यावर
कुणी बनू शकतं
किती जास्त महान....
मूळ कविता: इंकार
मूळ कवी: अंजू शर्मा
मूळ भाषा: हिंदी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा