सोमवार, १५ सप्टेंबर, २०१४

ईर्ष्या...

खरंच विश्वजेत्या
तुझा हा ऎश ट्रे मला खूप आवडतो
अगदी पापाच्या फुलाप्रमाणे
उमलत आहे तुझ्या टेबलावर
खरंच...

उद्या अणुबॉम्ब पडेल
आपण सगळेच मारले जाऊ
सगळंच नष्ट होऊन जाईल
तरीही या टेबलावर असाच चमकत राहील
तितक्याच आकर्षकपणे हाच ऎश ट्रे

आज मला
या ऎश ट्रेशी ईर्ष्या होत आहे
हो, मला ईर्ष्या होत आहे.



मूळ कविता : ईर्ष्या
मूळ कवी : अरुण कमल

मूळ भाषा : हिंदी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा