एकदा पुन्हा ती
विचार करतेय
आपल्या जीवनाबद्दल
परसदारी
भांडी घासण्यापासून
दिवसाची सुरवात करण्यापासून
आणि
तुटलेल्या खाटेच्या
लोंबत्या धाग्यांच्या
झोपाळ्यात
रात्र कूस बदलेपर्यंत
जिवंत असण्याची
जाणीव करून देणारं
काय शिल्लक राहिलंय?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा