कधी कधी नाकारली जाते
मी, माझ्याकडूनच
माझ्याच विचारांच्या पातळीवर.
माझ्या एकाकीपणाचं गूढ उकलताना
नाहीच लावावा वाटतं पूर्णविराम
कोणत्याही उत्तरावर.
तरीही नाकारत नाही मी
माझं ‘मी’पण
कदाचित असेलही तो अहंकार
इतरांच्या नजरेत.
मात्र नाकारावंस वाटतं मला
माझं नाकारलं जाणं...
माझं आत्मभान
आणि त्याला जोडून येणारं
माझं एकाकीपण,
हाच बहुदा माझा मणिकांचन योग
माझ्या ‘मी’पणाची व्याख्या करण्याचा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा