येशू
मी माणूस आहे
तुला अशा प्रकारे सुळावरून खाली नाही पाहू शकत!
नाहीतर तुझ्या माझ्यात काय फरक?
मुलांनी आज
खिळे काढून तुला मुक्त केलं,
कारण अल्लड आहेत ते
तुझं स्थान कुठे आहे
त्यांना माहित नाही.
त्यांना कुतूहल वाटतं
तुला असं खिळ्यांवर ठोकलेलं पाहून,
म्हणून संधी मिळताच तुझी मूर्ती क्रॉसपासून
वेगळी केली त्यांनी.
पण मी...
मी सभ्य माणूस आहे
जगात प्रेम, माया, वात्सल्य, उपदेश,
सुळावर टांगलेलेच योग्य आहेत
असो. चल,
मुलांनी केलेली चूक मी सुधारते,
तुला पुन्हा खिळ्यांनी ठोकते,
क्रॉसवर लटकवते,
म्हणजे तू येशूच बनून राहशील...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा