काल रात्री पुन्हा रडलं आकाश,
जणू ढगांनी त्याच्या चेहऱ्यावर शाईच फासली,
तारे काजळाच्या कोठडीत धसमुसत राहिले,
त्यांच्या नशिबात काल एवढा अंधार होता.
हवा गोंधळ घालत राहिली.
वृक्षांनी डोक्याला हात लावले,
धरित्रीचा पदर भिजत राहिला,
कुणाला फरक पडला?
ढग गडगडत राहिले,
अट्टहास करत राहिले.
त्यांना माहित होतं
ऋतू त्यांचाच आहे....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा