बुधवार, १० सप्टेंबर, २०१४

रोज बदलते ऋतू...



इथले ऋतू रोज बदलतात
आणि लोकांचे स्वभावही.
एक ऋतू या घराचा आहे,
एक ऋतू शहराचाही.

एक ऋतू माझ्या मनाचा आहे.
निर्विकार...

विचार करतेय
जर कधी मी लावू शकले संगती
या साऱ्यांमध्ये
तर माझ्या मनाचा ऋतू
कोणता असेल?

तर कदाचित तिथे नेहमीच
वसंत असेल!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा