आपण देशाच्या सर्वोच्च नेत्याला
आपल्या सर्वात आवडत्या नेत्याला
सर्वात महत्त्वपूर्ण नागरिकाला
देऊया मोठ्ठा सन्मान
आश्चर्यकारक अभूतपूर्व नागरिक सन्मान....
फुलांनी नाही,
सोन्या-चांदीने नाही
नाण्यांनी नाही
आपण त्यांची रक्ताने
हो रक्ताने तुला करू....
या आपणही या
या बंधू-भगिनींनो
आम्हाला हवंय एकेका माणसाचं रक्त
एकेका माणसाचं रक्त
माणसाचं रक्त
रक्त
जय हिंद!
मूळ कविता : अपील
मूळ कवी : अरुण कमल
मूळ भाषा : हिंदी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा