शनिवार, १३ सप्टेंबर, २०१४

पळसपान

पळसाच्या पानाला
जर ठेवले गेले
पुस्तकांच्या पानात
हरवून जातो हिरवा रंग
हळू हळू...
उरतात फक्त जाळ्या
बंद पानांमधे
अशा पुस्तकात
जे उघडलं जातं
फक्त एकदाच
त्या पळसपानाला
आपल्या आत
सामावून घेण्यासाठी...



माझीच स्वरचित हिंदी कविता 'पलाशपर्ण' चा अनुवाद...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा