हे खरं आहे
अनेक प्रयत्नानंतरही
मी नाही लिहिली
एकही प्रेम कविता
फक्त लिहिला आहे
रेशनच्या बिलासोबत
घालवलेल्या
क्षणांचा हिशेब,
लिहिली आहेत डायरीत
औषधांसोबत
तमाम नकारांचीही
एक्सपायरी डेट,
लिहिली आहेत काही निरागस असत्य
आणि काही भयभीत सत्य
एखादी बेईमानी
आणि खूप काही तडजोडी,
कधीपासून प्रयत्नात आहे
कि डोळे मिटताच
समोर आलेल्या तुझ्या चेहऱ्यावरून
लक्ष काढून
लिहावी
मीही
एखादी तरल प्रेम कविता...
मूळ कविता: प्रेम कविता
मूळ कवी: अंजू शर्मा
मूळ भाषा: हिंदी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा