शनिवार, १३ सप्टेंबर, २०१४

प्रसंग

यावेळी मी ठरवलच
आतापासून प्रवासात कुणाच्या नादी नाही लागायचं
ना कुणाशी बोला-चालायचं
फक्त कामाशी काम ठेवायचं
भुईमुगाची शेंग फोडत खारट स्वाद घेत संपवेन प्रवास.

तो काळ गेला जेव्हा प्रवासी
कोणत्याही गोष्टीवरून भांडत, वाद घालत
पूर्ण करत लांबच लांब प्रवास
आणि कुणी कुणी तर या भांडणात इतका मश्गुल
कि भांडणाराच आठवण करून देई,
‘भाऊ उतरा आता, स्टेशन आलं तुमचं.’
आणि दोघे मोठ्या मुश्किलीने वेगळे होत
जाता जाता ही एखादा टोमणा मारून जात.

आज माझ्या तोंडून फक्त एवढंच निघालं,
‘रेल्वेचं भाडं खूपच वाढलंय.’
एवढं बोललो नाही तर समोरच्यांनी तोडलं माझं वाक्य
एक तर गरजलाच, ‘तुमच्यासारखी लोकंच
सरकारला बदनाम करतात.’
मग तो शिवीगाळ करू लागला.
आणि जेव्हा मी हटकलं
तेव्हा त्याने सरळ टेकवली
पिस्तुल

आणि कुणी काहीच बोललं नाही.


मूळ कविता : वाकया
मूळ कवी : अरुण कमल
मूळ भाषा : हिंदी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा