तू कुठे आहेस?
इथे नाही
तिथे नाही
कदाचित आत असावीस,
पण प्रत्येक गुहेच्या तोंडावर
प्रचंड शिळांचं बंद द्वार आहे ---
मीसुद्धा
इथे नाही
तिथे नाही
कदाचित आतच आहे
पण ही जी बाहेर आहे
माझीच ‘मी’
ती स्वतःच एक शिळा आहे
आतल्या मार्गातला
एक कठीण अवरोध---
आणि अशाप्रकारे माझं
माझ्यापर्यंत न पोहोचणं
एक असं अंतर आहे
जे एखाद्या प्रश्नाप्रमाणे
गुंजत रहातं
तू कुठे आहेस?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा