याआधीही पाहिलं होतं हे फळ
हुंगलं होतं
चाखलं होत अनेकदा
लहानपणापासूनच
पण आज पहिल्यांदाच जेव्हा पाहिलं
फांदीवर पिकणाऱ्या या फळाला
तेव्हा लक्षात आला खरा रंग-स्वाद-गंध
या छोट्याशा फळाचे
जमीन-आकाशपर्यंत पसरलेले संबंध....
मूळ कविता : जाना है
मूळ कवी : अरुण कमल
मूळ भाषा : हिंदी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा