पुरात बुडालेल्या झोपड्यांच्या
आकाशात
हेलिकॉप्टर भरारी घेतं,
दयेचे थेंब शिंपडत
पूर आणखी वाढवतं...
बांबूच्या आधाराने झुंजणारी
झोपडी
पुन्हा उभी राहण्यासाठी
पत्र्यांची चादर खडखडवत आहे,
छापरातल्या धुराने
आकाशाला
आग लागत आहे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा