वर्षेचे हे तुषार घेऊन
ऋतुराज हा आला,
ऋतुराजाच्या संगे
येती या जलधारा...
काळ्या मेघामधुनी
धुंद निशा ही लाजे,
या धुंदीत मन हे
माझे मेघासंगे नाचे...
बहरलेली सृष्टी ही
आनंदाचे गाणे गाई,
आनंदात या भिजून
झाली मुग्ध वनराई...
हर्षाचा तो थेंब टपोरा
गालावरी पडावा,
काव्यरचनेचा छंद
असा जीवनी जडावा...
तनामनाला भिजवून
जाई वर्षाधार,
अमृताचे झरे घेऊन
येती ऋतुषार…
ही
कविता माझ्यासाठी फार खास आहे. मान्य आहे इतर अनेक कवितांच्या मानाने फार साधारण
आहे. मात्र तरीही खास आहे. कारण आतापर्यंत माझ्या कविता अनेक ठिकाणी प्रकाशित
झाल्या असल्या तरी ऋतुषार ही प्रकाशित झालेली माझी पहिलीच कविता. माझी म्हणणं हेही
थोडं कठीणच आहे. मी आणि माझी मैत्रीण अश्विनी पेठे आम्हा दोघींची प्रकाशित झालेली
ही पहिली कविता. २००७-०८ मध्ये आमच्या शाळेने, पटवर्धन हायस्कूलने पहिल्यांदाच विद्यार्थ्यांनी
केलेल्या लेखनाचे हस्तलिखित तयार करण्याचा उपक्रम राबवला. या उपक्रमाच्या
पहिल्यावहिल्या हस्तलिखितात समाविष्ठ असणारी आमची ही खास कविता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा