शनिवार, २२ नोव्हेंबर, २०१४

नव्या कवीचे दुःख


दुःख आहे मी एका नव्या हिंदी कवीचे
बांधा
मला बांधा
पण कशात बांधाल?
कोणत्या लयीत? कोणत्या छंदात?

ही छोटी छोटी घरं
हे बुटके दरवाजे
कुलुपं एवढी पुरातन
आणि साखळ्याही इतक्या जर्जर
आकाश एवढंस
आणि हवाही एवढी कमी
तिरस्कारही एवढा गुपचूप
आणि प्रेमही एवढं एकट
सारंच संदिग्ध
बांधा
मला बांधा
पण कशात बांधाल?
कोणत्या लयीत? कोणत्या छंदात?
काय हे जीवन असंच संपून जाईल
शब्दांपासून शब्दांपर्यंत
जगणं
आणखी जगणं आणखी जगणं आणखी जगण्याच्या
या अविरत संघर्षात?

मूळ कविता : नये कवि का दुःख
मूळ कवी : केदारनाथ सिंह

मूळ भाषा : हिंदी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा