शनिवार, २२ नोव्हेंबर, २०१४

टिकून राहील ही पृथ्वी



मला विश्वास वाटतो
टिकून राहील ही पृथ्वी
जरी इतर कुठे नाही तरी किमान माझ्या हाडांत
ती राहील जशी राहत असते वाळवी
वृक्षांच्या खोडांत

जशी दाण्यांत राहते पोरकिड
ही राहील प्रलयानंतरही माझ्याआत
जरी इतर कुठे नाही तरी माझ्या शब्दांत
आणि माझ्या नश्वरतेत
ही राहील.

आणि एका सकाळी मी उठेन
मी उठेन पृथ्वीसोबत
पाणी आणि कासवांसोबत
मी उठेन आणि चालू पडेन
त्याला भेटायला
ज्याला कबूल केलंय
कि मी भेटेन....


मूळ कविता : यह पृथ्वी रहेगी.
मूळ कवी : केदारनाथ सिंह

मूळ भाषा : हिंदी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा