मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०१४

हिमालयाच्या मदतीला धावलेली सह्याद्रीची ढाल : यशवंतराव चव्हाण


यशवंतराव बळवंतराव चव्हाण
(१२ मार्च १९१३ – २५ नोव्हेंबर १९८४)


महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि एक राष्ट्रीय नेते. देवराष्ट्रे (सातारा जिल्हा) येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म. प्राथमिक शिक्षण कराड येथे घेऊन उच्च शिक्षण कोल्हापूर व पुणे येथे घेतले आणि बी.ए.एल्‌एल्‌. बी. झाले. १९३० साली महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केलीतेव्हा तीत भाग घेतला. १९३२ साली त्यांना पहिला तुरुंगवास घडला. या कारावासात मार्क्सवादाशी आणि मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारांशी त्यांचा परिचय झाला आणि त्यामुळे काँग्रेसमधील रॉयपंथीय गटाशी त्यांचे संबंध वाढले. दुसरे महायुद्ध सुरू होण्याच्या वेळी यशवंतराव चव्हाण यांना रॉय यांनी घेतलेली युद्धविषयक भूमिका त्यांना अमान्य झाली व ते काँग्रेसमध्येच राहिले व १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात ते सामील झाले. सातारा जिल्ह्यातील भूमिगत चळवळीत त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. यातून पुढे प्रतिसरकार स्थापन झालेपण त्यावेळी ते तुरुंगात होतेत्यामुळे प्रतिसरकारशी त्यांचा तसा फारसा संबंध राहिला नव्हता. १९४६ साली तेव्हाच्या मुंबई प्रांताच्या विधिमंडळाची निवडणूक होऊन यशवंतराव दक्षिण सातारा मतदार संघातून निवडले गेले आणि संसदीय चिटणीस झाले. १९४८ साली त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या चिटणीसपदावर नियुक्ती झाली व १९५२ च्या निवडणुकीनंतर ते स्थानिक स्वराज्य व पुरवठा खात्याचे मंत्री झाले. द्वैभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी १ नोव्हेंबर १९५६ रोजी सूत्रे हाती घेतली. १९६० साली महाराष्ट्र राज्य स्थापन झाले व त्याचे ते पहिले मुख्यमंत्री निवडले गेले. पुढे १९६२-६६ या काळात ते भारताचे संरक्षणमंत्री१९६६-७० गृहमंत्री१९७०-७४ पर्यंत अर्थमंत्री आणि १९७४ पासून परराष्ट्रमंत्री बनले.

रॉय यांची विचारसरणी व महात्मा गांधींची आंदोलने यांकडे यशवंतराव आकर्षित झालेतरी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या आचारविचारांचा त्यांच्यावर खोल ठसा उमटला आहे. नेहरूप्रमाणे डावीकडे झुकलेला मध्यममार्गी नेताअसे त्यांचे वर्णन करता येईल. त्यांच्या शासकीय तसेच प्रशासकीय कौशल्याचा व लोकनेतृत्वाचा प्रत्यय द्वैभाशिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्रिपद त्यांच्याकडे आलेतेव्हा आला. त्यांनी अल्पसंख्य बिगरमराठी समाजाचा आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा विश्वास आपल्या कर्तबगारीनेकार्यक्षम कारभाराने संपादन केला व मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्याने काहीही उलथापालथ होणार नाहीयाची वरिष्ठ नेत्यांस खात्री पटविली.

चिनी आक्रमणानंतर संरक्षणखात्यात चैतन्य आणण्याची जबाबदारी यशवंतरावांनी पार पाडली. १९६७ च्या निवडणुकीनंतर काँग्रेसचा अनेक राज्यांत पराभव झाला. त्यामुळे देशात जी अस्थिर परिस्थिती निर्माण झाली होतीत्या परिस्थितीत त्यांनी गृहखाते खंबीरपणे पण कौशल्याने सांभाळले. अर्थखाते त्यांच्याकडे आलेतेही बांगला देशाचे युद्धदुष्काळ वगैरेंमुळे खालावलेल्या आर्थिक परिस्थितीत. माजी संस्थानिकांचे तनखे रद्द करणे इ. उपाययोजना त्यांच्या कारकीर्दीत झाल्या. चलनवाढीला आळा घालण्याचे कडक उपाय योजण्याच्या धोरणाचा प्रारंभही यशवंतरावांच्या कारकीर्दीत झाला.

कार्यक्षम मंत्रीयशस्वी संसदपटू आणि जनसामान्यत ज्याची मुळे रुजली आहेतअसा उदारमतवादी नेता असे यशवंतरावांचे थोडक्यात वर्णन करता येईल. चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ ते राजकारणात होते  आणि पंचवीसपेक्षा अधिक काळ अधिकारपदावर त्यांनी काढला होता. ते उत्तम वक्ते व लेखक होते. त्यांची विचारप्रवर्तक भाषणे सह्याद्रीचे वारे (१९६२) व युगांतर (१९७०) या ग्रंथांतून संगृहीत केलेली आहेत. महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर त्यांनी निरनिराळ्या क्षेत्रांत अनेक नव्या उपक्रमांना चालना दिली. हे उपक्रम ज्याप्रमाणे सहकारी साखर कारखानदारीचे आहेततसेच जिल्हा परिषदाभाषा संचालनालयसाहित्य संस्कृति मंडळ वगैरे प्रकारचेही आहेत. त्यांच्याबद्दल परप्रांतीयांना आशा वाटतेतर महाराष्ट्रीयांना ते एक विश्वासाचे ठिकाण आहेत.

१९६९ साली काँग्रेसमध्ये फूट पडलीतेव्हा ती सावरण्याच्या कामी यशवंतरावांनी आटोकाट प्रयत्न केले. देशात यादवीचे वातावरण न ठेवता समन्वयाचे असावेकारण भारतासारख्या प्रचंडभिन्न भिन्न जातिधर्मांच्या देशात त्याखेरीज आर्थिकसामाजिकसांस्कृतिक प्रगती होणार नाहीही यशवंतरावांची धारणा होती. पुरोगामी विचारांचा ते पाठपुरावा करीत. ते पोथीनिष्ठ नव्हते. नीतिमूल्यांचा पुरस्कार व्यवहारात व्हावाअशी त्यांची इच्छा व प्रयत्न असत. झगमगाटापेक्षा संथपणासातत्य हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य होते आणि तेच त्यांचे शक्तिस्थान आहे.




योजना
·         पंचायत राज या त्रिस्तरीय (जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत) व्यवस्थेची सुरुवात. (प्रशासकीय विकास)
·         राज्य पंचवार्षिक योजनांचा प्रारंभ. (आर्थिक विकास)
·         कोल्हापूर प्रकारच्या बंधाऱ्यांचा प्रचार. कोयना व उजनी ह्या प्रमुख प्रकल्पांच्या उभारणीला गती. (मूलभूत सोयी सुविधांचा विकास)
·         १८ सहकारी साखर कारखान्यांची स्थापना. (सहकाराला चालना)
·         मराठवाडा (आत्ताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) व कोल्हापूर विद्यापीठ यांची (शिवाजी विद्यापीठाची) स्थापना. (शैक्षणिक विकास)
·         राज्यातील कृषी विद्यापीठांच्या स्थापनेतही संकल्पनात्मक सहभाग. (कृषिविकास)
·         मराठी साहित्य संस्कृती महामंडळ व विश्र्वकोश मंडळाची स्थापना. (सांस्कृतिक विकास)
·         तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींपासून ते ना.धों. महानोरांपर्यंतच्या विचारवंतांशी व साहित्यिकांशी त्यांचे चांगले संबंध होते. कृष्णाकाठ, ऋणानुबंध आदी पुस्तकांतून त्यांच्यातील लेखकही दिसतो.


यशवंतराव चव्हाणांचे चरित्र सांगणारी पुस्तके
·         आधुनिक महाराष्ट्र के शिल्पकार (लेखक के.जी. कदम)
·         यशवंतराव चव्हाण, व्यक्तित्व व कर्तृत्व (लेखक : गोविंद तळवलकर)
·         यशस्वी यशवंतराव (रा.द.गुरव)
·         यशवंतराव चव्हाण : चरित्र (बाबूराव बाळाजी काळे)
·         यशवंतराव चव्हाण : व्यक्ती व कार्य (कृ.भा. बाबर)
·         यशवंतराव चव्हाण : व्यक्ती और कार्य (परमार रंजन)
·         आमचे नेते यशवंतराव (रमणलाल शहा)
·         यशवंतराव बळबंतराव चव्हाण (नामदेव व्हटकर)
·         Chavan,The Man of Crisis (B.B.Kala)
·         Chavan and the Trouble Decade (T.V. Kunnikrishnan)
·         Yashawantrao Chavan (Chandulal Shah)
·         Man of Crisis (Baburao Kale)
·         YB Chavan: A PoliTical Biography (D.B. Karnik)
·         यशवंतराव चव्हाण जीवन दर्शन (पंजाबराव जाधव)
·         सोनेरी पाने (भा.वि.गोगटे)
·         यशवंतराव : इतिहासाचे एक पान (रामभाऊ जोशी)
·         घडविले त्यांना माऊलीने (ग.शं. खोले)
·         ही ज्योत अनंताची (रामभाऊ जोशी)
·         यशवंतराव चव्हाण गाजते कीर्ती (दुहिता)
·         मुलांचे यशवंतराव चव्हाण (जे.के. पवार)
·         नवमहाराष्ट्राचे शिल्पकार (दत्तात्रय बारसकर)
·         कृष्णाकाठचा माणूस (अरुण शेवते)
·         वादळ माथा (राम प्रधान)
·         यशवंतराव चव्हाण - चरित्र (अनंतराव पाटील)
·         भारताचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण (डॉ.पंजाबराव जाधव)
·         यशवंतराव चव्हाण (प्रा.डॉ.कायंदे पाटील)
·         सह्याद्रीचा सुपुत्र (डॉ. न.म. जोशी) (मराठी, इंग्रजी, हिंदी, सिंधी, गुजराथी भाषेत.)
·         यशवंतराव चव्हाणांची ग्रंथसंपदा[संपादन]
·         आपले नवे मुंबई राज्य (इ.स.१९५७)
·         ॠणानुबंध (आत्मचरित्रपर लेख) (१९७५)
·         कृष्णाकाठ (आत्मचरित्र १ला खंड) (१९८४). हे पुस्तक बोलके पुस्तक या स्वरूपातही आहे.
·         भूमिका (१९७९)
·         महाराष्ट्र राज्य निर्मिती विधेयक (१९६०)
·         विदेश दर्शन - (यशवंतराव यांनी परदेशाहून आपल्या पत्नी सौ. वेणूताईंस पाठविलेल्या निवडक पत्रांचा संग्रह) (१९८८)
·         यशवंतराव चव्हाणांचे भाषण संग्रह/पुस्तिका[संपादन]
·         असे होते कर्मवीर (भाऊराव पाटलांवर सह्याद्रीच्या दिवाळी अंकातील लेख - १९६८)
·         उद्याचा महाराष्ट्र - (चव्हाण यांची भाषण पुस्तिका -१९६०)
·         काँग्रेसच्या मागेच उभे राहा - औरंगाबाद येथील भाषण - पुस्तिका
·         कोकण विकासाची दिशा (कोकण विकासाचे यशवंतराव चव्हाण यांनी केलेले विवेचन - पुस्तिका -१९६०)
·         ग.वा.मावळंकर स्मारक व्याख्यानमालेमध्ये प्रत्यक्ष आंदोलन और संसदीय लोकतंत्रया विषयावरील व्याख्यान, (पुस्तिका - १९६१)
·         जीवनाचे विश्वरूप : काही श्रद्धा, काही छंद (पुस्तिका - १९७३)
·         पत्र - संवाद (संपादक: स.मा.गर्गे - २००२)
·         पक्षावर अभंग निष्ठा (राजकारणातील माझी भूमिका- पुस्तिका )
·         महाराष्ट्र- म्हैसूर सीमा प्रश्न (पुस्तिका - १९६०)
·         महाराष्ट्राची धोरण सूची - (पुस्तिका - १९६०)
·         यशवंतराव चव्हाणांची महत्त्वपूर्ण भाषणे - सत्तरीच्या दशकाचा शुभारंभ - १९७१
·         युगांतर (निवडक भाषणांचा संग्रह - १९७०)
·         लोकांचे समाधान हीच यशस्वी राज्यकारभाराची कसोटी (राज्याच्या ४१ जिल्ह्यांच्या कलेक्टर परिषदेपुढे केलेल्या भाषणाची पुस्तिका- १९५७)
·         वचनपूर्तीचे राजकारण - अखिल भारतीय काँग्रेसच्या फरिदाबाद व बंगलोर अधिवेशनातील दोन भाषणे (पुस्तिका - १९६९))
·         विचारधारा - (भाषण संग्रह - १९६०)
·         विदर्भाचा विकास (महाराष्ट्राचे कर्तृत्व जागे केले पाहिजे) - (भाषण पुस्तिका - १९६०
·         शब्दाचे सामर्थ्य ( भाषणे - २०००; संपादक: राम प्रधान)
·         शिवनेरीच्या नौबती (भाषण संग्रह) - तळवळकर गोविंद व लिमये अ.ह. प्रकाशक - पुणे, व्हीनस बुक स्टॉल - १९६१
·         सह्याद्रीचे वारे (भाषण संग्रह - १९६२)
·         हवाएँ सह्याद्रि की (सह्याद्रीचे वारे या पुस्तकाचा हिंदी भाषेत अनुवाद)
·         India's foreign Policy - १९७८
·         The Making of India's Foreign Policy - १९८०
·         Winds of Change – १९७३

चित्रपट

·         यशवंतराव चव्हाण - बखर एका वादळाची. (मार्च २०१४) (दिग्दर्शक जब्बार पटेल)






यशवंतराव चव्हाण नावाच्या संस्था
·         यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड (पुणे)
·         यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, मुंबई रिक्लेमेशन, मुंबई
·         यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जगन्‍नाथ भोसले रोड, मुंबई
·         यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक
·         यशवंतराव चव्हाण मेमोरियल (म्युनिसिपल) हॉस्पिटल (YCM), पिंपरी(पुणे)


यशवंतराव चव्हाणांचे पुतळे
·         कऱ्हाड, पिंपरी(पुणे), फलटण, सातारा, संसद भवनाच्या लॉबीत(नवी दिल्ली)


संदर्भ : 1. Kale, B. B. Man of Crisis, Bombay, 1969.

    2. Kunhi, Krishnan, T. V. Chavan and the Troubled Decade, Bombay, 1971.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा