बुधवार, २६ नोव्हेंबर, २०१४

स्वातंत्र्य १३

माझ्या शब्दांत उपरोधाची धार
वाढत गेली तेव्हा
होत गेल्या कत्तली
अनेकांच्या दंभाच्या
आणि मस्तावल्या अहंकाराच्या...

उसळून आला तेव्हा साऱ्यांचाच
दुबळा स्वाभिमान
आणि घेरलं गेलं मला,
मला उभं केलं गेलं
आरोपीच्या पिंजऱ्यात...

माझ्या स्वातंत्र्याचा, अभिव्यक्तीचा,
खून पडत असताना
मीच ठरले खूनी
इतरांच्या प्रतिष्ठेची...

माझ्या शब्दांत उपरोधाची धार
वाढत गेली तेव्हा
हळूहळू संपत गेलं माझ्यातलं
कोवळं मन
हरवून गेले कोवळे दिवस
आता राहिलाय
फक्त विद्रोह
संघर्ष,

संघर्ष आणि संघर्षच....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा