मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०१४

ती



एवढ्या दिवसानंतर
ती या क्षणी बरोबर
माझ्यासमोर आहे

ना काही सांगणं
ना ऐकणं
ना मिळवणं
ना गमावणं
फक्त डोळ्यांसमोर
एका परिचित चेहऱ्याचं असणं

असणं –
एवढंच पुरेसं आहे

फक्त एवढ्यानेही
सुटतात
अनेक प्रश्न
अनेक शब्दांत
फक्त एवढ्यानेच भरून आलाय काठोकाठ अर्थ
कि ती आहे

ती आहे
आहे
आणि चकित आहे मी
कि एवढ्या वर्षानंतरही
ती अगदी त्याचप्रकारे
हसत आहे

आणि फक्त
एवढंच पुरेसं आहे.

मूळ कविता : वोह
मूळ कवी : केदारनाथ सिंह
मूळ भाषा : हिंदी




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा