शनिवार, ८ नोव्हेंबर, २०१४

श्रद्धा

श्रद्धा
नैसर्गिक आहे
कृत्रिम नाही,

जन्मते जमिनीतून
कुंडीतून नाही.

ती अंकुरते
हृदयाच्या तळातून,
आणि विखुरते
हलक्याशा धक्क्यातून.

यात शंकाच नाही कि
कुंडी किमती आहे
आणि विकाऊदेखील

पण श्रद्धा अमुल्य आहे
तिची विक्री होत नाही
आणि म्हणूनच ती
कुंडीमध्ये जन्मत नाही....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा