बुधवार, २६ नोव्हेंबर, २०१४

एक कौटुंबिक प्रश्न



छोट्याशा अंगणात
आईने लावली
तुळशीची दोन रोपटी

वडिलांनी लावला
डेरेदार वटवृक्ष

मी माझा लहानसा गुलाब
कुठे लावू?

मुठीमध्ये प्रश्न घेऊन
धावत आहे रानावनात,
डोंगरदऱ्यात
वाळवंटात...
निष्फळ.



मूळ कविता : एक पारिवारिक प्रश्न
मूळ कवी : केदारनाथ सिंह

मूळ भाषा : हिंदी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा