मंगळवार, ४ नोव्हेंबर, २०१४

मानिनी

साचलेल्या आसवांचे ऋण मी फेडू कुठे?
आटला नाही झरा त्या बांध मी घालू कुठे?
संपली नाही प्रतीक्षा भागली नाही तृषा
सागराच्या शांत पाण्या सांग मी धावू कुठे?
नाकारतो शांत वारा भूमी अजुनी शांत आहे
सांग आता तूच अग्नी सांग मी जावू कुठे?
काट्यांतूनच वाट माझी मी अशी मानिनी

दिसेच ना मुक्ती तर उगा दूरवर पाहू कुठे?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा