गुंतून पडली आहे कविता हृदयामधे
कडवी अडकली आहेत ओठांमध्ये
फुलपाखरांप्रमाणे विहरण करणारे
शब्द कागदावर उतरतच नाहीत.
केव्हापासून बसलो आहे सखे
कोऱ्या कागदांवर तुझे नाव लिहून
.
.
हम्म. फक्त तुझं नाव पुरेसं आहे
यापेक्षा उत्कृष्ठ कविता ती काय असणार?
मूळ कविता : नज्म
कवी : गुलझार
मूळ भाषा : हिंदी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा