आज पुन्हा त्या पक्ष्याला पाहिलं
ज्याला गेल्या वर्षी पाहिलं होतं
जवळपास याच दिवसांत
याच शहरात...
काय नाव आहे त्याच,
खंजन,
टिटवी,
निळकंठ,
मला काहीही आठवत नाही,
मी किती सहज विसरून जाते
पक्ष्यांची नावं,
मला विचार करूनही भीती वाटते...
पण नेमकं नाव काय होतं त्याचं,
मी उभ्या-उभ्या विचार करते
आणि डोकं खाजवते,
हा या माझ्या शहरात
एका लहानशा पक्ष्याच्या परत येण्याचा विस्फोट
होता,
ज्याने भर रस्त्यात
मला हादरवून सोडलं...
मूळ कविता : पक्षी की वापसी
मूळ कवी :
केदारनाथ सिंह
मूळ भाषा : हिंदी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा