गुरुवार, ७ ऑगस्ट, २०१४

चंद्राच्या येण्याची एक तऱ्हा...



उष्म्याने काल रात्री अचानक जाग आली


वाटलं तलावाच्या थंड पाण्यात एखादी डुबकी मारून यावं


बाहेर येऊन तलावाकडे पाहिलं, आणि चक्रावून गेलो.


न जाणो केव्हापासून न विचारता चंद्रमा येऊन माझ्या तलावात पहुडला होता,


आणि तरंगत होता,


उफ्फ, कालची रात्र खरंच खूप उष्ण होती...





मूळ कविता : चांद के आने का एक अंदाज

कवी : गुलझार

मूळ भाषा : हिंदी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा