गुरुवार, १४ ऑगस्ट, २०१४

लोकहिताचे काम...

तिथे एक अद्भुत दृश्य होतं...

मेघ बरसून मोकळे झाले होते,
शेतं नांगरणीसाठी तयार होती,
एक मोडलेला नांगर बांधावर पडला होता,
आणि एक चिमणी सारखी-सारखी
आपल्या चोचीने
त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होती...

मी पाहिलं,
आणि मी परत आलो,
कारण मला वाटलं माझं तिथे असणं
लोकहिताच्या त्या कामात
नाक खुपसण्यासारखं होईल...


मूळ कविता : जनहित का काम
मूळ कवी : केदारनाथ सिंह

मूळ भाषा : हिंदी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा