कधी कधी मला वाटतं,
दाटून यावं आभाळ,
आणि काळोखल्या भर दुपारी
रुतून जावं मी,
खोल खोल
धरित्रीच्या हृदयात,
खोल इतकं
की कुंध्यानं ठरवलं
तरी सापडू नये त्याला
माझं मूळ...
अन् मग आभाळ मोकळं झाल्यावर
एके दिवशी
यावं तरारून
जणू एखादा नवा कोंब,
नव्या आशांना नवी उभारी आणणारा...
त्या कोंबानेही मग वाढत जावं,
झेलत राहावं तुफान,
कोसळत राहाव्या विजा,
दुभंगत जावी अवघी धरणी,
आणि अशा प्रलयानेच घ्यावं मला कुशीत,
पण,
त्याच्या विध्वंसात माझी उमेद संपवण्याचं
सामर्थ्य असेल तरंच....
दाटून यावं आभाळ,
आणि काळोखल्या भर दुपारी
रुतून जावं मी,
खोल खोल
धरित्रीच्या हृदयात,
खोल इतकं
की कुंध्यानं ठरवलं
तरी सापडू नये त्याला
माझं मूळ...
अन् मग आभाळ मोकळं झाल्यावर
एके दिवशी
यावं तरारून
जणू एखादा नवा कोंब,
नव्या आशांना नवी उभारी आणणारा...
त्या कोंबानेही मग वाढत जावं,
झेलत राहावं तुफान,
कोसळत राहाव्या विजा,
दुभंगत जावी अवघी धरणी,
आणि अशा प्रलयानेच घ्यावं मला कुशीत,
पण,
त्याच्या विध्वंसात माझी उमेद संपवण्याचं
सामर्थ्य असेल तरंच....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा