जेव्हा मुक्तीचा कोणताही मार्ग मिळत नाही
मला लिहावसं वाटतं...
मला लिहावसं वाटतं "वृक्ष
हे माहित असूनही की लिहिणं म्हणजेच वृक्ष होणं,
मग मला लिहावसं वाटतं पाणी...
"माणूस",
"माणूस" लिहावसं वाटतं मला,
एखाद्या बालकाचा हात,
एखाद्या स्त्रीचा चेहरा...
मी पूर्ण ताकदीनिशी
शब्दांना फेकू पाहतो माणसांच्या दिशेने,
हे माहित असूनही
की माणसाचं काहीच बिघडणार नाही...
मला भर रस्त्यात ऐकावासा वाटतो तो विस्फोट
जो माणूस आणि शब्दांच्या धडकेतून निर्माण होतो...
लिहिण्याने केवळ काही होणार नाही
हे माहित असूनही
मला लिहावसं वाटतं...
मूळ कविता : मुक्ती
मूळ कवी : केदारनाथ सिंह
मूळ भाषा : हिंदी
मला लिहावसं वाटतं...
मला लिहावसं वाटतं "वृक्ष
हे माहित असूनही की लिहिणं म्हणजेच वृक्ष होणं,
मग मला लिहावसं वाटतं पाणी...
"माणूस",
"माणूस" लिहावसं वाटतं मला,
एखाद्या बालकाचा हात,
एखाद्या स्त्रीचा चेहरा...
मी पूर्ण ताकदीनिशी
शब्दांना फेकू पाहतो माणसांच्या दिशेने,
हे माहित असूनही
की माणसाचं काहीच बिघडणार नाही...
मला भर रस्त्यात ऐकावासा वाटतो तो विस्फोट
जो माणूस आणि शब्दांच्या धडकेतून निर्माण होतो...
लिहिण्याने केवळ काही होणार नाही
हे माहित असूनही
मला लिहावसं वाटतं...
मूळ कविता : मुक्ती
मूळ कवी : केदारनाथ सिंह
मूळ भाषा : हिंदी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा